हरेगाव मतमाऊली यात्रेनिमित्त जनजागृती अभियान – अनिल भोसले
प्रतिनिधी —
पंथ सारे विसरून जाऊ ! ख्रिस्ती सारे एक होवू !! या ब्रीद वाक्याखाली महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यात ख्रिस्ती समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी देशभरात ख्याती असलेल्या हरेगाव येथील मतमाऊली यात्रा सोहळ्या निमित्ताने गेल्या दहा वर्षापासून सुरू करण्यात आलेले जनजागृती अभियान यावर्षीही १० ते ११ सप्टेंबर २०२२ रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

ख्रिस्ती समाजाच्या विविध क्षेत्रातील समस्या सोडवणुकीच्या दृष्टीने गाव पातळीपासून ते देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन सकारात्मक समन्वयाची भूमिका घेऊन एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, विकास साधण्यासाठी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करून त्यांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे. विविध प्रशिक्षण शिबिरातून मुला मुलींच्या सुप्तगुनांना वाव देणे, अन्याय निवारणासाठी प्रयत्न, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, तळागाळातील लोकांमध्ये जागृती करून त्यांच्यामध्ये नेतृत्व विकास करणे, वर्षभरात राज्यस्तरीय मिळावे, चिंतन शिबिरे व धार्मिक सभेचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.

याप्रसंगी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, विश्वस्त अविनाश काळे, जयमालाताई पवार आदी मार्गदर्शन करणार असून, या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, राज्य कार्यकारी सदस्य अंतोन भोसले, प्रकाश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय संसारे, चंद्रकांत उजागरे, प्रभाकर जगताप, सचिन मंतोडे, अजित सुडके, प्रमोद शिंदे, संदीप हिवाळे, निशिकांत पंडित, प्रकाश निकाळे, विजय त्रिभुवन, अशोक पालघडमल, फेड्री फर्नांडिस, सचिन बोरुडे, योगेश भालेराव, मार्कस बोर्डे, मनोज संसारे, प्रशांत यादव, सिमोन रूपटक्के, बाळासाहेब भोसले, सनी गायकवाड, आदींनी केले आहे.

