संगमनेर – अकोले तालुक्यातील तिघेजण हद्दपार !
पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचे आदेश
प्रतिनिधी —
संगमनेर उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी एक वर्षाच्या मुदती करिता हद्दपार केले आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून या तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्ष मुदती करता हद्दपार काढण्यात आले आहे. असे आदेश उपविभागीय अधिकारी मदने यांनी १ सप्टेंबर २०२२ रोजी बजावले आहेत.

१) अविनाश विलास देवकर (राहणार घुलेवाडी, तालुका संगमनेर) याच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दारू विक्री, असे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यास हद्दपार करण्यात आले आहे.
२) समाधान बाळासाहेब सांगळे (राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर) याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण करणे, शेतकऱ्यांना मारहाण करणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यालाही हद्दपार करण्यात आले आहे.
३) जनार्दन कमलाकर नवले (राहणार नवलेवाडी, तालुका अकोले) याच्याविरुद्ध मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, दुखापत असे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला सुद्धा हद्दपार करण्यात आले आहे.

अशाप्रकारे अविनाश विलास देवकर, जनार्दन कमलाकर नवले, समाधान बाळासाहेब सांगळे या तिघांना एक वर्षां करिता अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
