थोरात कारखान्यावर गणेशोत्सवानिमित्त दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम !
किर्तन – लावणी – सदाबहार नृत्ये – रांगोळी – संगीत खुर्ची स्पर्धा !
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमीत्त बुधवार दि ३१ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेबर २०२२ या काळात विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी थोरात कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सवाचे भव्य आयोजन होत असते. यानिमीत्त राज्यभरातील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. त्यामुळे कारखाना कार्यस्थळ हे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. यावर्षी बुधवार दि. ३१ रोजी गणेश मिरवणूक व स्थापना, गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. गणेश शिंदे यांचे जिवन सुंदर आहे. या विषयावर व्याख्यान, शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. लावण्यांचा सुपर हिट कार्यक्रम नाद खुळा, शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी चित्रकला, रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा, रविवारी ४ सप्टेंबर रात्री ८ वा. लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे व सह कलाकारांचा लावण्य दरबार हा कार्यक्रम, सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे हरिकिर्तन, मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. टाईमपास फेम सिनेअभिनेता प्रियदर्शन जाधव यांचे हसता हसवता हे नाटक, बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी वक्तृत्व व गायन स्पर्धा, गुरुवार ८ सप्टेंबर रात्री ८ वा. महाराष्ट्राची गौरव गाथा हा विविध रंगीय कार्यक्रम, शुक्रवार दि ९ सप्टेंबर रोजी गणेश मिरवणूक व विसर्जन होणार आहे.

यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,आमदार डाॅ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात, संतोष हासे आदिंसह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिक, युवक व महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन संदिप दिघे, अशोक कवडे, सुर्यभान कानवडे, भाऊसाहेब चासकर, सोमनाथ राऊत, नवनाथ सोनवणे, राधू दिघे, सुभाष कुटे, गिताराम साबळे, विलास वैराळ व राजेंद्र बड आणि अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

