वृक्षांना राख्या बांधत अनोखे रक्षाबंधन !

तळेगाव दिघे विद्यालयाचा उपक्रम ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

प्रतिनिधी — 

महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ५१० वृक्षांना राख्या बांधत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या निमित्ताने विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक प्रा. दिपक जोंधळे व कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे व पर्यवेक्षक बी. सी. दिघे यांच्या संकल्पनेतून उपक्रमशील शिक्षक राधाकिसन दिघे, सुनिल घुले, महेश उगार सहित शिक्षक – शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दिघे विद्यालयातील विद्यार्थींनींनी वृक्षांना राख्या बांधत अनोखा रक्षाबंधन  उपक्रम राबविला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी तब्बल ५१० वृक्षांना राख्या बांधव अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या निमित्ताने वृक्षांचे संवर्धन व रक्षण करण्याचा संकल्प विद्यार्थी – विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी केला. विद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिल्याचे प्राचार्य एच. आर. दिघे यांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमाचे महाराष्ट्र शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक दिपक जोंधळे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे सहित पदाधिकारी तसेच मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!