संगमनेरातील गणेश मंडळांचा होणार गौरव !

शिवसेना शाखा क्र. ११, मेनरोडचा उपक्रम 

संगमनेर : प्रतिनिधी

शिवसेना शाखा क्र. ११, मेनरोड, संगमनेर यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. यावर्षी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गणेश मंडळांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवककैलास वाकचौरे यांनी दिली आहे.

संगमनेर शहरातील ज्येष्ठ समाजभूषण, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व बँकिंग क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व स्व. बिहारीलाल पंजाबी तसेच मेनरोड बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी स्व. श्रीनिवास अट्टल यांच्या स्मरणार्थ शहरातील गणेश मंडळांना ढाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी साकारलेल्या आरास व देखावे, भव्य मूर्ती, उत्कृष्ट मूर्ती, भव्य लायटिंग, समाजप्रबोधनाचे देखावे, पौराणिक देखावे, ऐतिहासिक देखावे, पौराणिक व ऐतिहासिक नाटके तसेच भव्य मिरवणूक आणि शांततापूर्ण मिरवणूक यांसह विविध प्रकारच्या उल्लेखनीय उपक्रमांचा गौरव करण्यात येणार आहे.

याबरोबरच संगमनेर शहरातील कलाकार, मूर्तिकार, गायक, व्यंगचित्रकार, पत्रकार तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांचेही स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे आयोजन उत्साहात करण्यासाठी शिवसेना शाखा क्र. ११चे कार्यकर्ते व शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.

या उपक्रमासाठी कैलास वाकचौरे, बाळासाहेब डावखरे, दत्ता भांदुर्गे, अमित पवार, भैय्या तांबोळी, नारायण वाकचौरे, गोटूशेठ अट्टल, विजू नाना बाप्ते, संजय वालवाणी, कृष्णा केसेकर, सुनील गायकवाड तसेच इतर कार्यकर्ते व शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.

या कार्यक्रमास समीर ओझा, अविनाश थोरात, शशी घोलप, सुधीर वडनरे, काशिनाथ गोसावी, हरीश सारडा, राजाराम गुंजाळ, शाम करपे, अतुल पटेल यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!