संगमनेरात दिव्यांग साहित्य नोंदणी शिबिर संपन्न 

शहर व तालुक्यातील ७६२ नावांची नोंदणी

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन चा उपक्रम

 प्रतिनिधी —

केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तीना मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या नोंदणी शिबीरात तालुक्यातील ७६२ दिव्यांगला भार्थ्यांनी आपल्या साधनसाहित्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नविनभाई शहा मंगल कार्यालयात या नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीर स्थळी शहर आणि तालुक्यातील दिव्यांग व्यकी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी येवून आपल्या साधन साहीत्याची नोंद केली.

सकाळी ९ वाजता या शिबीराचा प्रांरभ करण्यात आला. ग्रामीण आणि शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी सकाळपासूनच शिबीरस्थळी गर्दी करुन आपल्या अर्जाची नोंद करुन घेतली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ अशोक इथापे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अहमदनगर जिल्हयाचे संपर्कप्रमुख पांडुरंग सबाजी कासार, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, दिव्यांग संघटनेचे विनायक दाभोळकर, सुनिल खरे, राम जाजू, राजेंद्र सांगळे, किशोर नावंदर, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, संदीप देशमुख, किसान आघाडीचे सतिष कानवडे, अमोल खताळ, डॉ. सोमनाथ कानवडे, माजी नगरसेविका मेधा भगत, दिपेश ताटकर, बापू देशमुख, शिवाजी आहेर, गोरक्ष घुगे, सुनिल घुले, माधव थोरात, राहुल भोईर, साहेबराव घुगे, रोहिदास साबळे, यांनी शिबीरात सहभागी झालेल्या लाभार्थीना नोंदणीसाठी सहकार्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यक साधन उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू केली.केवळ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्डवर या कागदपत्रांवर सहाय्यक साधनांसाठी लाभार्थ्यांचे नोंदणीपत्र ऑनलाईन पध्दतीने भरून घेण्यात आले. शहरातील नवीनभाई शहा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या याशिबीरात अतिशय नियोजनपूर्वक व्यवस्था करण्यात आली होती.येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीना गाडीतून तसेच व्हीलचिअरवर येणाऱ्या व्यक्तीना कार्यकर्ते मदत करून नोंदणी टेबलापर्यत घेवून जात होते. चहा नाष्ट्याची व्यवस्था डॉ. विखे पाटील फौंडनशच्या वतीने करण्यात आली होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!