डॉक्टर्स स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ! 

अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचा उपक्रम 

 प्रतिनिधी —

अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतिने अकोले तालुक्यातील पहिले डॉक्टर्स स्नेहसंमेलन “अंतरंग २०२२” गाणे, संगीत आणि नृत्याच्या तालावर उत्साहात संपन्न झाले.

अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन नवले, सचिव डॉ. सतिष चासकर यांच्या संकल्पनेने व सांस्कृतिक सचिव डॉ. नीरजा कुलकर्णी, डॉ. विकास वाकचाैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विश्वाच्या कला अंतरंगाचे दर्शन घडविणारे पहिले स्नेहसंमेलन तालुक्यातील डॉक्टर्स व त्यांच्या मुलांनी संगीत, गाने गात व मिमीक्री तसेच नृत्य सादर करत अभिनव रंगमंचावर उत्साहात साजरे केले.

याप्रसंगी अकोले आमदार डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते मधुकर नवले, संगमनेर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रवीणकुमार पानसरे, डॉ. श्याम संगोराम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे उपस्थित होते.

यावेळी आमदार लहामटे म्हणाले कि, जनतेला सेवा देण्यात व्यस्त असताना धावपळ, जबाबदारी, तणाव या मुळे कुटुंब आणि स्वत:कडे लक्ष कमी होते. या धावपळीतून थोडासा विरंगुळा म्हणून आज अकोले तालुका मेडिकल असोसिएशनने घेतलेला अंतरंग हा कार्यक्रम खुप सुंदर आहे. यातून डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना सादर संधी मिळते. अशा सर्व उपक्रमांना माझी एक डॉक्टर व लोकप्रतिनिधी म्हणुन कायम साथ राहिल.

डॉ. प्रवीण पानसरे यांनी विविध कलाकारांचे आवाज काढत मिमिक्री करत सर्वाना हसविले. तर डॉ. श्याम संगोराम यानी सुंदर असे बुलबुल वादन केले. तर सिद्धांत चासकर (योग सादरीकरण), काजल सावंत (नृत्य), प्रीतेशकुमार वैद्य (नृत्य), निषाद कानवडे ( गिटारवादन), मैत्रेयी सहाणे (गीत), शरण्या वामन (नृत्य), सोहम चाैधरी (नृत्य), किर्ती आणि ग्रृप (नृत्य), डॉ. उमा कुलकर्णी ( एकपात्री सादरीकरण), डॉ.सतिष चासकर ( गीत), डॉ. रविद्र सावंत (गीत), मैत्रेयी सहाणे (एकपात्री सादरीकरण), अक्षदा नाईकवाडी (नृत्य), डॉ.सविता वामन (गीत), किर्ती जाजु (गीत), अर्णव सहाणे (वादन), डॉ.पुनम कानवडे आणि ग्रृप (नृत्य ), डॉ.अर्चना नवले (गीत), डॉ.तेजस शहा (गीत), डॉ.तृप्ती व डॉ. संदेश भांगरे (नृत्य), डॉ. आकांक्षा गायकवाड (गीत), डॉ. अनुप्रिता, डॉ. सुवर्णा मेहेत्रे, डॉ. दिपाली नवले, डॉ. नीरजा कुलकर्णी(समूह नृत्य), डॉ. विकास वाकचाैरे (गीत), डॉ. नीरजा कुलकर्णी (गीत) यांनी सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सुत्रसंचलन डॉ.उमा कुलकर्णी व डॉ. असिफ तांबोळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयसिंग कानवडे, डॉ. संतोष कानवडे, डॉ. कैलास गायकवाड, डॉ.घनकुटे, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टरांनी परीश्रम घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!