वड पौर्णिमेनिमित्त ११०० वडवृक्षांचे रोपण —  दुर्गाताई तांबे

दंडकारण्य अभियान !

 

१४ जून ते २० जून तालुक्यात वटवृक्ष लागवड सप्ताह साजरा होणार

प्रतिनिधी —

हरित सृष्टी सह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणार्‍या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटवृक्ष लागवड सप्ताहात मंगळवार दि. १४ जुन ते २० जुन या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर ११०० वडवृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यावर्षीचा वडपौर्णिमा उत्सव एकत्रित कार्यक्रम हा मंगळवार दिंनाक १४ जुन २०२२ रोजी कपारेश्‍वर डोंगर, खांडगाव येथे सकाळी ९ वा. होणार असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे यांनी दिली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे सतरावे वर्ष आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्यप्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे व प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे व कांचन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे.

भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा असणार वडपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देववृक्ष म्हणून संबोधले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सीजन निर्माण करतात. हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सीजन मिळणार आहे. वडवृक्षाची सावली व थंडावा पशुपक्षांनाही आकर्षित करतो म्हणून असा हा वडवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी ११०० वडवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे.

वडपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे. पर्यावरणाचा र्‍हास होत चालल्याने ग्लोबल वॉर्मिगची समस्या उभी राहून उन्हाळ्याात लहान, मोठ्या सजिवांना जगणे असह्य झाले आहे.

दंडकारण्य अभियान हे   लोकचळवळ ठरली आहे. प्रत्येक महिलेने एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. घराच्या भोवती परसबाग लावून फळझाडे, फूलझाडे वाढवावी. येणार्‍या पिढीला चित्रातून झाडे दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष त्या झाडाच्याच सावलीत खेळण्याचा आनंद मिळावा म्हणून दंडकारण्य अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे. महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!