भाजपा ओबीसी मोर्चाचे लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी —
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता करून मध्यप्रदेश सरकारने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवले, परंतु महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता न करता वेळकाढूपणा करत ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण घालवले, ओबीसी समाजाचा राजकीय घात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चा, संगमनेरच्या वतीने संगमनेर प्रांत कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते, त्यासाठी आयोग स्थापन करण्याच्या सुचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या, परंतु राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासच उशीर केला, आणि आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला नाही म्हणून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले, मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात वेळेत सादर केला परिणामी मध्यप्रदेशात ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण पुनःस्थापित होऊ शकले, महाराष्ट्रात ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी ठाकरे पवार सरकार असल्याचा घणाघात यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी केला.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर, संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संगमनेर शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत,ओबीसी मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष संपत गंलाडे, तालुका अध्यक्ष ॲड. गोरक्ष कापकर, तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, शहर सरचिटणीस आणि माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जहागिरदार, व्यापार आणि उद्योग आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शिरीष मुळे, किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, शहर सरचिटणीस भगवान गिते, संजय नाकील, शहर उपाध्यक्ष कैलास भरीतकर, सिताराम मोहरीकर, सुनिल खरे, कांचन ढोरे, मनोज जुंदरे, राहुल भोईर, दिलीप रावळ, दिपेश ताटकर, हरीश चकोर, बाबुराव खेमनर, शिवकुमार भंगिरे, भगवान कुक्कर, बालाजी लालपोतु, प्रशांत वाडेकर, स्वानंद रासने, जितेंद्र माळवदे, शाम कोळपकर, संपत गेठे, नवनाथ वावरे, कोंडाजी कडनर, अशोकराव कानवडे, बुवाजी खेमनर, पप्पु तेजी, शाम कासार, साहेबराव वलवे, ॲड. संदिप जगनर, संतोष भालसिंग, संतोष पठाडे, विकास गुळवे आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
