ढोलेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाल्यामुळे ग्रामस्थांकडून नामदार थोरात यांचा सत्कार
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असलेल्या ढोलेवाडी या महसुली गावाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे आता स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने याबाबतची सूचना जारी केली आहे. ढोलेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा ढोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

२०१८ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ढोलेवाडी मधील लोकसंख्या २४२४ होती. आता ती ५ हजारांच्या आसपास गेली आहे. गुंजाळवाडी ढोलेवाडी हि एकत्र गावे होती. याबाबत ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीतील क्षेत्र मोठे असल्याने विकास कामांचे नियोजन करण्यासाठी अडचणी येत होत्या. गुंजाळवाडी व ढोलेवाडी ग्रामपंचायत हे अंतर खूप होते . ढोलेवाडी संगमनेर शहर लगत असल्याने ढोलेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

ग्रामस्थांच्या या मागणीवरून कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अभिजीत ढोले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ढोलेवाडीस स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला आहे.

ढोलेवाडी ग्रामपंचायतीस स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित गवळी, सुधाकर ताजणे, अरुण रवींद्र धुळे, दीपक पवार, सरपंच वंदना गुंजाळ, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, पोलीस पाटील गणेश म्हस्के आदी उपस्थित होते.
