गरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठीच काम — नामदार थोरात
महाविकास आघाडी सरकारचे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय

चंदनापुरी येथे पाच गावांच्या वतीने नामदार थोरात यांचा कृतज्ञता गौरव सोहळा
प्रतिनिधी —
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची अनुदानही लवकरच दिले जाणार असून संगमनेर तालुक्यात सातत्याने विकास कामांसाठी निधी दिला जात आहे. शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे समाजातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

चंदनापुरी येथे चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी या गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी ५९ कोटी रुपयांचा भरीव निधी दिल्याबद्दल या गावांच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कृतज्ञता गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात, लक्ष्मणराव कुटे, दूध संघाचे माजी चेअरमन आर.बी.रहाणे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, शांताराम कढणे, विजय राहणे, सरपंच शंकर राहणे, उपसरपंच भाऊराव राहणे, गणपतराव सांगळे, संतोष हासे, राजेंद्र चकोर, विलास कवडे, मारुती कवडे, सुरेश झावरे, रमेश गुंजाळ, संतोष मांडेकर, गोरख नवले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंदनापुरी येथील सोसायटी, दूध संस्था, पतसंस्था व ग्रामपंचायतच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार नामदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
थोरात म्हणाले की, राजकारण हे समाजातील शेवटच्या घटकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी करावयाचे असते. संगमनेर तालुक्यात ही समृद्ध परंपरा जपली जात आहे. प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. निळवंडेसह विविध रस्त्यांची कामे ही अत्यंत वेगाने सुरू आहे. या सर्व कामां साठी मोठा पाठपुरावा केला आहे. तालुक्यात विविध पाणीपुरवठा योजनांसाठी मोठा निधी मंजूर झाला असून यामुळे या गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. हे सरकार सर्वसामान्य माणसाचे आहे. जनतेचा मोठा विश्वास सरकार वर असून महाराष्ट्र विकासातून देशाला दिशादर्शक काम करत असल्याचे ही ते म्हणाले.
तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्यासाठी मोठा निधी मिळून विकास कामांचा धडाका कायम सुरू ठेवला आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन कायम तालुक्याच्या तालुक्याची प्रगती साधली आहे. सध्या देशात व राज्यात जाती धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करू पाहत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी धर्माचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जि.प.सदस्य मिलिंद कानवडे, उपसरपंच भाऊराव रहाणे यांचीही भाषणे झाली. यावेळी विक्रम थोरात, अनिल कढणे, एल.आर.राहणे, कैलास सरोदे, बाबजी सरोदे, रोहिदास रहाणे, के.बी.राहणे, भाऊसाहेब कढणे, सोमनाथ काळे, विलास रहाणे, हर्शल राहणे, किरण रहाणे, राजेंद्र रहाणे,साहेबराव सातपुते, किरण नवले, माधव वाळे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, ऋतिक राऊत, रमेश नेहे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, जीवन प्राधिकरण चे शिरसागर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कढणे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर रहाणे यांनी केले तर रोहिदास रहाणे यांनी आभार मानले. यावेळी चंदनापुरी सह पाच गावांतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
