मतदारयादी मध्ये भौगोलिक सलगता आणण्याची भाजपची मागणी
प्रतिनिधी —
२०२२ सालाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीत भौगोलिक सलगता आणण्याची मागणी आज संगमनेर भाजपतर्फे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकतीद्वारे करण्यात आली आहे.

संगमनेर भाजपतर्फे येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक असमानता आहे. मतदार यादीचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की, एकाच गल्ली मध्ये असलेल्या शेजारी शेजारील घरांमध्ये मतदारांची नावे, पहिल्या मतदार यादी मध्ये अनुक्रमाणे होती. परंतु आत्ता प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादी मध्ये शेजारील घरांमध्ये काही पानांचे अंतर आहे. काही ठिकाणी एकाच घरातील सदस्य वेगवेगळ्या पानांवर आहेत. काही वेळा मतदान केंद्र सुद्धा दुसरे असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या सदोष यादीमुळे निवडणुकीतील उमेदवार, मतदान स्लीप वाटणारे शासकीय कर्मचारी, प्रशासन व खुद्द मतदार यांना मोठ्या अडचणी येतील.

यावेळी तहसीलदार संगमनेर यांच्याकडेही स्वतंत्र हरकत नोंदविण्यात आली आहे. तसेच संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनाही प्रारुप मतदार यादीत झालेल्या चुका निदर्शनास आणून देऊन दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

भाजपचे राम जाजू , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, ओ बी सी आघाडीचे जिल्हा संघटक शिवकुमार भंगिरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, विकास गुळवे, जग्गु शिंदे, युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अरुण शिंदे, संजय बागले, रोहिदास साबळे, प्रमोद भोर, सोमनाथ बोरसे, राहुल शिंदे, दिलीप रावल, ज्योती भोर, रेश्मा खांडरे, अनुराधा पटेल, सुनील लोखंडे, मुकेश गायकवाड यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे सदर मागणी केली आहे.
