ड्राय- डे च्या दिवशी दारूची विक्री करताना तिघांना पकडले ! अकोले पोलीसांची कारवाई

५६ हजार ७६० रुपयांचा एकुण २० बॉक्स इतका दारुसाठा जप्त
प्रतिनिधी —
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ड्राय- डे असताना अकोले शहरात देशी दारूची विक्री करताना अकोले पोलिसांनी तिघांना पकडले असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मद्य दुकांनासाठी ड्राय- डे असल्याने अकोले शहरात व परिसरात अवैध रित्या दारुची विक्री होणार असल्याबाबत गोपनिय माहिती अकोले पोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी मिथुन घुगे यांना मिळल्यानंतर त्यांनी पोलीस पथक तयार करुन अकोले शहरात व परिसरात शाहुनगर, सुभाष रोड, अगस्ती कारखाना रोड, आंबेडकर नगर या ठिकाणी अवैध दारुची साठवणुक व विक्री करणाऱ्या ठिकांणावर छापे टाकुन २० देशी दारुचे बॉक्स पकडुन एकुण ५६ हजार ७६० रुपंयाचा देशी दारुचा मुद्देमाल जप्त केला.

धनेश्वर काशिनाथ पवार (रा. आंबेडकर नगर, अकोले), विलास शंकर पवार (रा. सुभाष रोड, ता. अकोले), सतिष विलास पवार (रा. सुभाष रोड, ता. अकोले), उषा शेटीबा पवार (रा. शाहुनगर, ता. अकोले), माधुरी गायकवाड (रा. कारखाना रोड, ता, अकोले जि अ.नगर) यांच्या विरुदध अकोले पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील धनेश्वर पवार, विलास पवार, सतीश पवार या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री अथवा अवैध दारूची वाहतूक होत असल्यास पोलिसांना त्वरित कळवावे. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पोलिस हवालदार महेश आहेर, पोलिस नाईक विठ्ठल शेरमाळे, महिला पोलीस नाईक संगिता आहेर, पोलीस शिपाई अविनाश गोडगे, सुयोग भारती, कुलदिप पर्बत, विजय आगलावे, सुहास गोरे, मनिषा पारधी यांनी केले असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश आहेर हे करीत आहेत.

