फडणवीस यांचे पुस्तक वाचतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकला….

सत्यजित तांबे यांची सोशल मीडियावर खरडपट्टी !
घराण्यासह राजकारणाचा केला उद्धार !!

प्रतिनिधी —
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ‘ज्ञान व अज्ञान यामधील अंतर मिटवणार सुंदर साधन म्हणजे पुस्तक…!
अशी पोस्ट करणारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल करण्यात आले असून वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून तांबे यांच्यावर अक्षरश: टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी फेसबुक वरून देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले ‘अर्थसंकल्प’ (सोप्या भाषेत) हे पुस्तक वाचतानाचा फोटो सत्यजित तांबे यांनी व्हायरल केला होता. त्यावरून तांबे यांना सोशल मीडियातून ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियातील फेसबुकवर आलेल्या एका पोस्टवर तांबे यांना ट्रोल करणाऱ्या खालील प्रतिक्रिया आल्या आहेत.
हे असले काँग्रेसी….
मामा पक्षात नेते असल्याने तुमचे हे नखरे चालून जातात पण कार्यकर्त्यांच्या मनातून तुम्ही उतरत जातात त्याचं काय???
ज्यांनी ६० वर्ष असणारे राज्याच्या डोक्यावरील कर्ज फक्त साडे चार वर्षात दुप्पट केले ( २.५९ लाख कोटी वरून ४.७६ लाख कोटी ) …तयांचे हे तांबे महाराज पुस्तक वाचन करीत आहेत ?
एकमेकांचे जोडे उचलायचे फक्त …दुसरे काय ?
तेच तर…किमान अक्कल दाखवावी ही अपेक्षाही यांच्याकडून ठेवता येत नाही…
२०१९ ला संगमनेर येथील प्रचार सभेला आलेला राहुल एका दुकानातून T shirt विकत घेतो व रेस्ट हाऊस ला स्वतः चे कपडे स्वतः धुतो..हे विसरलेत ही मंडळी..
बाळासाहेबांनी हे जे घरचे सगळे पदाधिकारी बनवलेत त्यांच्या वर्तनाची काळजी घ्यायची आहे… दूसरे विखे पाटील होण्याची चिन्हं दाखवत आहेत सर्जेराव
नाही होत. मोठा फरक आहे .
हे शेळपट आहेत , अर्थ शास्त्र पण हे कोणाकडून शिकणार ?
आईजीच्या जीवावर बायजी उदार असे झाले आहे यांचे यांना पाहिले रिटायर्ड करा आणि नवीन टीम आणावी लागेल काँग्रेस ला यांनी पिढ्यान् पिढ्या राजकारणात घातल्याने मग अशी तळी उचलतात.
अगदी खरंच आहे, राहुल गांधी बोलतात अधून मधुन पण यांच्या भेज्यात काहीही शिरत नाही…कुंडली मारून बसलेत हे
असल्या लोकांन मुळे तर काँग्रेस संपून चालली आहे
जनतेचा बळी देतात फक्त
अडाणचोट…आव आणतात इंटुक असल्याचा…. नशिब पुस्तक उलटं नाही धरलं
संधी शोधत असतील, एखादे गणित सुटले तर सुटले
त्यांच्या ×××× ED ची काडी लावली असेल…
Manage congress leader ….!!!
एकंदरीत पाहता सोशल मिडिया वरून तांबे यांना ट्रोल करताना काही व्यक्तींनी कठोर शब्दप्रयोग केले असले तरी त्यांच्या प्रतिक्रिया मात्र कडवट आहेत. यातून एक मात्र नक्की की, तांबे यांच्याकडून किंवा काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्यांकडून चांगले काम करण्याची अपेक्षा जनतेला असावी. त्यामुळे त्यांच्याविषयी राग व्यक्त होताना दिसतो.
