तालुक्यातील महिला बचत गटांना मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन मार्केट सुविधा — डॉ. जयश्री थोरात

एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांसाठी ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून दिले जाणार
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्याच्या विकासाचा वेग कायम असून महिला सक्षमीकरणाचेही काम सातत्याने झाले आहे. तालुक्यात महिला बचत गटांचे मोठे जाळे असून या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या शहरांमध्ये मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा निर्माण करुन दिली जाईल. असे प्रतिपादन डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

पिंपळगाव कोंझिरा येथे एकविरा फाउंडेशन व स्थानिक बचत गट यांच्यावतीने विविध तयार केलेल्या वस्तू व विक्री याबाबत झालेल्या महिला कार्यशाळेत ते बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, सरपंच बादशहा वाळुंज, बापूसाहेब करपे, उपसरपंच कुसुम गाडे, सुभाष करपे, सुरभी पवार, प्राजक्ता घुले, रवींद्र खलाटे, विकास आहेर, संतोष करपे, दीपक करपे, लक्ष्मण अडांगळे, जयराम करपे ,मच्छिंद्र आहेर, मोनिका करपे, रमेश नेहे, विक्रम मोरे, संजय आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. थोरात पुढे म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मार्केट मिळावे यासाठी एकविरा फाउंडेशन च्या माध्यमातून गेली तीन वर्ष एकविरा मार्केट सुरू केले आहे. संगमनेर तालुक्यातील बचत गटांना मोठ्या शहरांमध्ये मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. याचबरोबर महिला या कुटुंबाचा आधार असून त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे सांगताना प्रत्येक महिलेने आरोग्याच्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात. तसेच चांगले आहाराचे नियोजन करावे असेही त्या म्हणाल्या.

तर जिप सदस्य रामहरी कातोरे म्हणाले की, डॉ. जयश्री थोरात यांनी महिला बचत महिलांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले असून एकविरा फाउंडेशन ने महिला बचत साठी ऑनलाईन पद्धतीने मार्केट सुरू करून दिले तर संगमनेरच्या महिलांनी उत्पादित केलेल्या माल महाराष्ट्रात कोणत्याही शहरांमध्ये जाऊ शकतो हा एक अभिनव प्रयोग असल्याचे ते म्हणाले.

यावेळी विष्णुपंत रहाटळ ,बादशहा वाळुंज, सुरभी पवार, तालुका बचत गट समन्वयक खलाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . सुप्रिया कर्पे, मंजुषा कर्पे, स्वाती कर्पे, ऐश्वर्या कर्पे यांनी बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ उद्योगांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कर्पे यांनी केले. संतोष कर्पे यांनी सूत्रसंचालन केले तर सुभाष कर्पे यांनी आभार मानले. यावेळी पिंपळगाव सह या भागातील विविध बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
