संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील १२ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६५ कोटी रूपये मंजूर
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या १२ गावांसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष सहकार्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पठार भागातील जवळे बाळेश्वर, पिंपळगाव माथा, महालवाडी, सावरगाव घुले, सारोळे पठार, माळेगाव पठार, वरूडी पठार, गुंजाळवाडी पठार, डोळासणे, कर्जुले पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर या गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६५ कोटी रूपये मंजूर झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना फटांगरे म्हणाले की, राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या संकटानंतर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला असून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीच्या विकासाकरता अनेक योजना राबवल्या आहेत. विविध गावांकरीता एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्या गावांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल यासाठी प्रयत्न केले आहे. पठार भागातील जवळे बाळेश्वर, पिंपळगाव माथा, महालवाडी, सावरगाव घुले, सारोळे पठार, माळेगाव पठार, वरूडी पठार, गुंजाळवाडी पठार, डोळासणे, कर्जुले पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर या गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६५ कोटी रूपये मंजूर झाले आहे.

हा भरीव निधी मिळाल्याबद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजित थोरात यांचे पठार भागातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
