महागाईवरून लक्ष वळवण्यासाठी हनुमान चालीसाचा वाद !

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी —

केंदातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष या वलंत मुदयांवरुन दुसरीकडे वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे काम काही लोक जाणीवपुर्वक करीत आहेत अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता थोरात म्हणाले कि, देशातील जनता महागाईने होरपळत आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न आहेत. केंद्र सरकार या प्रश्‍नांवर अपयशी ठरलेले आहेत. मुख्य मुद्यांवरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही लोकांना पुढे करुन भाजप राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. देशात सध्या धार्मिक राजकारण करुन जातीय तेढ निर्माण केला जात आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था उत्तम असून प्रशासन त्यांचे काम करीत आहेत, पण वातावरण गढूळ करण्याचे काम करीत आहेत.

महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे मनसुबे ओळखून आहे. असेही थोरात म्हणाले. सरकार भक्कम आहे आणि आम्ही सर्व जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. तसेच रायातील जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!