स्फोटकांचा वापर करून संगमनेरात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले !

२० लाख रुपयांची चोरी

प्रतिनिधी —

संगमनेर शहरालगत असलेल्या अमृतवाहिनी कॉलेज समोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम स्फोटकांचा वापर करून करून अज्ञात चोरट्यांनी फोडून २० लाख ७७ हजार ५००  रुपये रक्कम चोरून  नेली आहे. या घटनेन  संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात दोन अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून संजीव कुमार ओमकार उर्फ योगेंद्र रॉय यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

संगमनेर शहरापासून ३ किमी अंतरावर  अमृतवाणी कॉलेज (घुलेवाडी) समोर एचडीएफसी बँकेचे हे एटीएम होते. सध्या अमृतवाहिनी कॉलेज ते बस स्थानका पर्यंत जुन्या पुणे नाशिक हायवे चौपदरीकरणाचे रस्त्याचे काम सुरू आहे.

रस्त्यांच्या कामामुळे काहीतरी स्फोटाचा आवाज झाला असावा  असे स्थानिक नागरिकांना वाटले. मात्र चोरट्यांनी या संधीचा फायदा उठवत हे एटीएम फोडून पैसे नेले.

यापूर्वीही संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे अशाच पद्धतीने  स्फोटकांचा वापर करून एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्यात आले होते.  घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा चोरट्यानी  एचडीएफसी बँकेच्या एटीएम ला लक्ष्य केले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या दोन टीम चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या आहेत.

हा स्फोट इतका मोठा होता की, बँकेचे एटीएम मशीन अक्षरशः शंभर फुटावर येऊन पडले होते. या ठिकाणी पोलिसांना स्फोट घडवून आणण्यासाठी वापरलेलं साहित्य ही मिळून आल आहे.

स्फोटके नेमकी कोणती ?

याआधी देखील संगमनेर तालुक्यातील सामनापूर येथे  स्फोटकांच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली होती. अगदी तसाच प्रकार आता या नवीन प्रकरणात घडलेला आहे. हा स्फोट नेमका कोणत्या स्फोटकांच्या साह्याने केला आहे हे मात्र पोलिसांना अद्यापही समजले नाही.

जिलेटीन वापरून हा स्फोट केला असल्याची चर्चा असली तरी त्याची अद्याप शहानिशा झालेले नाही. समनापूर येथे झालेल्या स्फोटाची देखील कोणती कारणे होती. कोणती स्फोटके वापरले होती.  याबाबतही पोलिसांकडून कोणतीच माहिती मिळालेली नाही.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!