मोहात पाडणारा … मोह !

व्हिस्की नको, रम नको, बियर तर नकोच नको, पण मोहाची हवी. 

 

मोहाच्या फुलांची मद्यप्रेमीना भुरळ पडली आहे. स्कॉच आणि व्हिस्की पिणारेही आता मोहाच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. असे असले तरीही मोहाचा इतर गोष्टींसाठी पण उपयोग केला जातो. मोह म्हणजे फक्त मद्य असे गृहीत धरून आपण जे काही एकप्रकारे या झाडाला बदनाम करत आहोत ते थांबवले पाहिजे. मोहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

फुल

फुलापासून दारू तयार केली जाते, तसेच गाई किंवा शेळी गर्भ धारणा होत नसेल तर फुलाचा रस काढून तो रस त्यांना पाजतात. फुलांपासून ज्यूस, चटणी, लाडू व इतर काही वेगवेगळे पदार्थ लोक बनवू पाहत आहे व बनवायला लागले आहेत.

झाडाची साल – 

सालीचा उपयोग खोकला, सांधे दुखी, पाठ दुखी, हातपाय दुखणे यावर खूप गुणकारी आहे.

फळ – 

मोहाच्या झाडाच्या फळापासून आपण तेल पण काढू शकतो , त्यांची भाजी पण बनवतात ,त्यांना मोहट्या म्हणतात.

असेही म्हटले जाते की, मोहाची १ / २ वाळलेली फुले नियमित सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यावर हाडांचे आजार, संधिवात, हातपाय दुखणे थांबते.

विजया पाडेकर, भंडारदरा टुरिझम, आपलं शिवार संस्था…

मोहाच्या फुलाची फक्त दारू नाही करत. सरबत, सुकलेल्या फुलांची जवस घालून चटणी, यात नाचणीचे पीठ मिसळून त्याचे लाडू, शेंगदाणे किंवा इतर सुका मेवा घालून चिक्की,पारंपरिक पदार्थ-लापशी, मुठ्ठे, राब , गोड आयते, सुकवून तिखट मीठ लावून चिवडा आणखी पदार्थ करता येतात. औषधी आहे. शुभदा देशमुख

आयुर्वेदात आसव तयार करण्यासाठी यांचा फरमेंट करण्यासाठी वापर केला जातो.अशीच धायटीची फुले पण वापरतात.यात गोड व कडू असे दोन प्रकार असतात.ही वाळवून बेदाण्या सारखी वर्षभर वापरता येतात.सुकीसुद्धा खातात तसेच सुकलेल्या भिजवून वाटून त्यात बसेल तेवढी कणिक घालून घारग्या सारख्या पुऱ्या वा गोड भाजीपण छान लागतात मुळातच यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने या गोष्टी चविष्ट लागतात.यूपीत यांच्या फळापासून वनस्पतीजन्य तूप तयार करतात ज्याचा स्वयंपाकात वापर होतो.सुक्या मोहाच्या फुलांना आयुर्वेदिक औषधी कंपनी विकतही घेत असाव्यात.
उमा उल्हास कुलकर्णी

 

RRAJA VARAT

2 thoughts on “मोहात पाडणारा … मोह !”
  1. मोह झाडं किती मोठं वाढते?
    घराच्या अंगणात लावता येतं का?
    असल्यास मोहाचे रोप किंवा बी कुठे मिळेल.

    1. वृक्ष वर्गीय आहे.जंगलात या झाडाखाली रोपे सापडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!