संगमनेर शहरात दिवसाढवळ्या तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची चोरी !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील गुन्हेगारीचे वाढते स्वरूप लक्षात घेता शहराला अधिक सुरक्षा कवचाची गरज निर्माण झाली आहे.
संगमनेर शहरातील गणेश विहार कॉलनी मधून एका व्यक्तीच्या घरातून ५ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आलेली आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना १० मार्च रोजी बुधवारी सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
संगमनेर शहरातील गणेश विहार कॉलनी, मालदाड रोड, येथे राहणारे मारुती हंसाराम उगलमुगले यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या किचनची कडी उघडून फ्रीज वर असणाऱ्या खबर मधील कप्प्यात ठेवलेली चावी घेऊन नंतर घराचे कुलूप उघडून घरातील हॉलमध्ये असलेल्या शिलाई मशीन वर ठेवलेल्या पिशवी मधील ५ लाख २५ रुपये किंमतीची रोकड चोरुन नेलेली आहे.

एकंदरीत पाहता शहरात हा गुन्हा अक्षरशः दिवसाढवळ्या घडलेला आहे. विशेष म्हणजे घराला कुलूप आणि किचनच्या दरवाजाची कडी उघडून चोरट्याने अगदी माहिती असल्याप्रमाणे फ्रीजच्या कव्हर मधील कप्प्यात ठेवलेली चावी घेऊन ही चोरी केल्याने कुणीतरी माहितगार व्यक्ती त्यात सामील असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

नाटकी नदी पुनर्जीवन कधी करणार आहे व संगमनेर टाईम्सने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. संपूर्ण नाटकी नदी अतिक्रमण झाल्यामुळे नदीचं पात्र दिसत नाही.
संगमनेर म्हणजे संगम नहर असा त्रिवेणी संगमाच्या काठावर वसलले गाव उत्तर पश्चिम भारतातले विजयनगर संस्थान महंमद शहा अब्दाली यांच्या अतिक्रमण केले म्हणून तेथील सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी काळापासून राघोबादादा पेशवे यांनी अटकेपार हिंदवी साम्राज्य वाढवले व मराठी सैनिकांना अफगाणिस्तान व संलग्न देशांमधे रहायला प्रोत्साहीत केले होते. अफगाणिस्तान मध्ये मराठी लोक आजही दिसतात व त्यांना महाराष्ट्र देश आवडतो. दक्षिण भारतात तंजावर व आजुबाजुचा प्रदेश शहाजी राजेंनी कब्जा मिळवून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावांना राज्य कारभार ठेवले होते. कर्नाटक राज्यामध्ये हि शहाजी राजेंनी आपले कुटुंबियांना कारभार बघायला ठेवले होते. म्हैसूर संस्थानने मराठी राज्य कर्त्याबरोबर तह केला होता. टिपु सुलतान म्हैसूर ताब्यात घेऊ शकत नव्हता.
संगमनेर शहरात कुतूबशाहिने अहमदनगर च्या चांदबिबी ला घेरले होते. त्यामुळे संगम नहर हे नाव अस्तित्वात आला होता. नंतर संगम नहर हे नाव अपभ्रंश होऊन संगमनेर हे मराठी नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रसिद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खबरी व त्याचे सहकारी संगमनेर सिग्नल डुबेरे ठाणगाव भागातले होते. एकोणीसावे शतक सुरु झाले आणि सर डि एम पेटिट हायस्कूल मधून शिकलेले व मॅट्रीक पास नागरिकांना रेव्हेन्यु म्हणजे आताचे महसूल खात्यात नोकरी मिळाली त्यातले बरेचसे कलेक्टर कमिशनर या पदापर्यंत १०६०-१९७० सालापर्यंत संगमनेर व अहमदनगर शहरातले लोकांनी कारभार केलेला आहे. माझे वडील व त्यांचे चुलत भाऊ पुणे,सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव धुळे बीड उस्मानाबाद नांदेड अशा अनेक जिल्ह्यात मामलेदार ,प्रांत, डेप्युटी कलेक्टर कलेक्टर या पदाहून निवृत्त झाले होते.