पकडलेल्या गोवंश मांसाची विल्हेवाट लावायची कशी ?

संगमनेर शहर पोलिसांची झाली गोची !

प्रतिनिधी. —

संगमनेर शहरातीलअवैध कत्तल खान्यांवर छापे मारल्यानंतर अथवा गोवंश मांसाची वाहतूक होत असताना पकडल्यानंतर मिळालेल्या हजारो किलो मांसाची विल्हेवाट लावायची कशी असा मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.नगरपालिकेने पोलिसांनी पकडलेले गोमांस विल्हेवाट लावण्यासाठी घेण्याचे बंद केल्याने पोलिसांची मोठी गोची झाली असल्याची माहिती समजली आहे.

संगमनेर तालुक्यातील अवैध कत्तलखान्यांचा प्रश्‍न हा नेहमीचा ऐरणीवर असतो. या कत्तलखान्यातून दिवसाढवळ्या, रात्री नेहमीच गोवंश हत्या सुरू असते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा कत्तलखाना अनेक वेळा छापे घालून सुद्धा सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे.

संगमनेर शहर पोलीस, नगर पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षकांची विशेष पथके, गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस उपअधीक्षक यांची विशेष पथके आणि याही पेक्षा इतर पथकांकडून देखील संगमनेरच्या कत्तलखान्यावर वेळोवेळी कारवाई झालेली आहे. तरीही गोवंश हत्या कधीच थांबलेली नाही.

प्रत्येक वेळी कत्तलखान्यांवर छापे मारल्यानंतर पोलिसांना हजारो किलो गोवंश मांस मिळून आलेले आहे. शेकडो जनावरे मिळाली आहेत. व वाहने मिळाली आहेत. ही सर्व ताब्यात घेण्यात येतात. वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परंतु हे सर्व करत असताना आता नव्याने पोलिसांनी समोर एक जटिल प्रश्न उभा राहिला आहे. पकडलेल्या गोमांसाचे करायचे काय ? या गोमांसाचे विल्हेवाट लावायची कशी ? हा प्रश्‍न आता पोलिसांसमोर उभा आहे.

यापूर्वी कत्तलखान्यांवर छापे टाकल्यानंतर कापलेल्या जनावरांचे मिळालेले मांस हे नगरपलिकेच्या ताब्यात देण्यात येत होते. नगरपालिका विविध ठिकाणी मिळालेल्या जागांमध्ये हे गोमांस मोठ्या प्रमाणात जमिनीखाली पुरून टाकत होती. आता हे गोमांस घेण्याचे नगरपालिकेने बंद केलेले आहे. गोमांस गाडण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. गोमांस जमिनीखाली खूप खोलवर गाडावे लागते. नाहीतर भटकी कुत्री व इतर मांस खाणारे जनावर ते पुन्हा वर काढतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. नागरिकांना त्रास होतो. आणि असे गोमांस गाडण्यासाठी आता जागाही उपलब्ध नसल्याने नगरपालिकेने हे गोमांस गाडण्यासाठी घेण्याचे बंद केले आहे.

त्यामुळे छापा टाकल्यानंतर मिळालेले गोमांस आता गाडायचे कुठे ? त्याची विल्हेवाट लावायची कशी ? पोलिसांसमोर माठी समस्या उभी राहिली आहे. मात्र याबाबत पोलिस सूत्रांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस निरीक्षक संगमनेर शहर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

RRAJA VARAT

One thought on “पकडलेल्या गोवंश मांसाची विल्हेवाट लावायची कशी ?”
  1. मुंबई मध्ये व पुण्यात प्राणिसंग्रहालय किंवा जंगल खाते वन्यजीव संरक्षण करण्यासाठी ठिक ठिकाणी नॅशनल पार्क आहेत त्यांना हे गोमास तिथल्या वाघ सिंहांसाठी खाद्य म्हणून संगमनेर पोलीस किंवा नगरपालिका देऊ शकतात. वाहतुक खर्च कोणी करायचे जंगल खाते व राज्य सरकार एकत्र बसून त्याचा निर्णय घेऊ शकतं. नामदार बाळासाहेब थोरात साहेब नक्की च मदत करतील.
    बाजारात कुंभार वाड्याकडे मशिदीच्या शेजारच्या रस्त्यावर मी ब-याचदा गाई बक-यांची मान अर्धवट कापून हालहाल करणा-या खाटिक लोकांना मी माझ्या बालपणी आणि १९९४-१९९५ साली मी माझ्या डोळ्याने किती क्रुरपणे गुरांच्या हत्या होतांना बघितले आहे.
    आता बिजेपी सत्तेवर आल्यापासून गोहत्येवर केंद व उत्तर प्रदेश सरकारने कायदा व कारवाई सुरू केली आहे हे एका दृष्टीने चांगले झालं आहे. पाश्चिमात्य देशातील जनता शाकाहाराकडे वळताना दिसत आहे. पंरतु भारतात ख्रिश्चन व मुस्लिम लोकसंख्या व गोमास खाणारे आहेत. त्याचं प्रबोधन करायला हवे. गोवा केरळ राज्यात गोमास सर्रास खाल्लं जातं आहे.
    बक्कर खाटिक समाज संगमनेर मध्ये आहे व तो त्यांचा पिढिजात व्यवसाय आहे. संगमनेर शहरात मुस्लिम व ख्रिश्चन समाज मोठा आहे त्यांचंहि प्रबोधन केले पाहिजे. हल्ली श्री श्री व इतर धार्मिक नेते कायम एकत्र येऊन धार्मिक तेढ कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
    माझे बरेच शाळकरी व काॅलेज मित्र व मी नोकरी करत असलेले मुस्लिम मित्र नमाज रमजान रोझे पाळत शाकाहार शंभर टक्के आहार घेतात. हा विचार करणं शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो त्या साठी सामाजिक तेढ कमी करायची गरज आहे. केंद्र सरकार समाज खाते मंत्री महोदयांना त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं तसंच आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!