आई सह तीन बालकांचे मृतदेह विहिरीत सापडले !

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात खळबळ !!
प्रतिनिधी —
महिलेसह तीन बालकांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे महिलेच्या आणि बालकांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.
स्वाती बाळासाहेब ढोकरे (आई), माधुरी (वय ४ वर्षे), भाग्यश्री (वय ३ वर्षे) व शिवम (वय ४ महिने) अशी मयतांची नावे आहेत.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या खांडगेदरा या गावात ही घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी आहे की, स्वाती बाळासाहेब ढोकरे महिलेसह तीन मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे, या घटनेनं पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. कोठे गावानजीक खांडगेदरा म्हणून गाव आहे. या गावात स्वाती बाळासाहेब ढोकरे या महिलेला एक मुलगा आणि दोन मुली होत्या. शिवम मुलगा चार महिन्याचा आहे. तर माधुरी नावाची मुलगी चार वर्षाची असून भाग्यश्री ही मुलगी तीन वर्षाची आहे.
या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला असून त्या खालोखाल तिच्या पोटच्या तीनही मुलांचाही विहिरीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान या महिलेचा पती आणि सासू लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर सासरा शेतामध्ये काम करत होता. अशी माहिती समजली आहे. या महिले सह तिच्या तीन मुलांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या धक्कादायक घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी भेट दिली आहे. घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील हे करत आहेत.
