विजेच्या टॉवरवर तारांची चोरी करत असताना गळफास लागून एकाचा मृत्यू

पाच जणांविरुध्द घारगाव पोलीसात गुन्हा दाखल; 

इनोव्हा कार व टेम्पोही केला जप्त

प्रतिनिधी  —

 

मोठ्या वीजवाहक तारांच्या टॉवरवरील ॲल्युमिनियमच्या विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला असून यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश रावसाहेब विघे (वय २० वर्ष) रा.पिलानी वस्ती चिकलठाण ता.राहुरी असे मयताचे नाव आहे.

ही घटना संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवारी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे. तर इनोव्हा कारसह पोलीसांनी टेम्पोही जप्त केला आहे.

विशाल राजेंद्र पंडीत (वय १८), आदित्य अनिल सोनवणे (वय २०) रा. शिंदोडी, संकेत सुभाष दातीर (वय २६), रा.प्रिंप्रिलौकी व सरफराज इक्बाल शेख रा.रामगड ता.श्रीरामपुर व एक विधीसंघर्षीत बालक अशी इतर आरोपींची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश रावसाहेब विघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात वीज वाहून नेणाऱ्या टॉवरवर टाॅवरची उंची जास्त आहे असे माहिती असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टाॅवरवर चढवले. आणि त्यास टाॅवरवरील ॲल्युमिनियम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले. त्याच्याकडून तारा कापून घेतल्या आणि त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने गळफास बसल्याने योगेशची हालचाल पूर्ण बंद झाली.

त्यानंतर वरील पाच जणांनी इनोव्हा कार क्रमांक एमएच २० एजी.५२५८ मधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी पी.एम.टी हाॅस्पीटल मध्ये नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी चौघांसह एका विधीसंघर्षीत बालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे करत आहेत. या घटनेत पोलीसांनी इनोव्हा कारसह टेम्पोही जप्त केला आहे.

RRAJA VARAT

One thought on “विजेच्या टॉवरवर तारांची चोरी करत असताना गळफास लागून एकाचा मृत्यू …”
  1. संगमनेर शहरात सुशोभिकरण होत आहे वाचून आनंद झाला व कुंड्या फोडल्याचा फोटो पाहून संगमनेर मध्ये किती वाईट्ट प्रवृत्तीचे लोक असली निंदनीय कामं करत असल्याचे वाचून सर्वात जास्त वाईट वाटलं.
    जमिनीचे भाव वाढत असल्याने गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे. भाईबंदकी व कौटुंबिक वाद घटना वाढ होत असल्याचे दिसत आहे. मलाही वैयक्तीक वाईट्ट प्रवृत्ती अभवायला मिळाली आहे. कोर्ट कचेरीत मधे वाढ होत आहे. संगमनेर टाईम्सने नजरेस सरकारी अधिकारी संगनमत करत आहेत हि बातमी नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. कोर्ट कचेरीसाठी नवीन इमारत घुलेवाडीला बांधल्या त्याचे दर्शन नाशिक पुणे प्रवास करताना पहात आलो आहे. उत्तम आकर्षक रंग रंगोटी केलेली ईमारत बघून लोकांना कोर्ट कचेरीत जाण्याचा मोह आवरत नाही असे वाटते आहे.
    सिंगल विंडो मधून सातबारा उतारे मिळतात पाहून खुप खुश झालो होतो पण आता तेथे काम करण्यासाठी खुप वेळ घेतात कधी कधी पुढची तारीख देऊन चकरा मारायला लावतात असा अनुभव घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!