स्मशानभूमीतील दहनस्थळाची तोडफोड !
खंडेरायवाडी येथील प्रकार

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठारभागात असणाऱ्या खंडेरायवाडी येथील स्मशानभूमीतील दहन स्थळाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली असून स्मशानभूमीतील काही सामान देखील चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
पिंपळगाव देपा गावच्या शिवारात खंडेरायवाडी असून गावाच्या बाहेर स्मशानभूमी आहे. बुधवारी रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने स्मशानभूमीमधील दहन स्थळाच्या लोखंडी जाळीची तोडफोड केली. तसेच स्मशानभूमीतील काही साहित्य देखील चोरून नेले.
दुसऱ्या दिवशी हे घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी स्मशानभूमीकडे जावून पाहिले असता तोडफोड करत इतर साहित्य चोरून नेले असल्याचे आढळून आले त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
