राहाता तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ ; एलसीबीची कारवाई

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाईची मोहीम सुरू केली आहे. राहाता व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१७ सप्टेंबर २०२६ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी या पथकाने राहाता व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची माहिती संकलित केली. त्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहाता पोलीस ठाणे हद्दीत कारवाई

राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात

१) विशाल संजय जोगदंड (वय ३५), रा. पुणतांबा बाजारतळ, शिर्डी

२) रामनाथ हरीभाऊ शिंदे (वय ३०), रा. लुटे वस्ती, पिंपळवाडी रोड, शिर्डी

यांना आरोपी करण्यात आले असून ३) स्वप्नील गोंदकर, पूर्ण नाव माहित नाही, रा. शिर्डी हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई

दुसरी कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी गु.र.नं. ४२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईतही १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात

१) आकाश दशरथ पगारे (वय २३), रा. कोपरगाव खडकी, ता. कोपरगाव

याला आरोपी करण्यात आले असून २) विशाल लोंढे, पूर्ण नाव माहित नाही, रा. सिन्नर, जि. नाशिक हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अशाप्रकारे राहाता व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आलेल्या दोन कारवायांमध्ये एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी एलसीबीकडून कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार सुनिल पवार, अरुण गांगुर्डे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे आणि सतीष भवर यांच्या पथकाने केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!