बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला ; दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी –

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक डंपर रंगेहात पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, वाळूची चोरी आणि अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सतीश राजाराम वाडगे (वय 28 वर्षे राहणार येठेवाडी, तालुका संगमनेर) ज्ञानेश्वर (माऊली) भाऊसाहेब लेंडे (राहणार खंदरमाळ, तालुका संगमनेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घारगाव पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सरकारी महसूल बुडवून वाळूची विनापरवाना, बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. पोलिसांनी डंपर अडवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर चोरलेली वाळू आढळून आली.

याप्रकरणी वाळू चोरून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!