संगमनेरात गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा मोठा छापा !… ३ जण अटक १५ लाख ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सहा आरोपी फरार असून त्यांचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महादेव गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सरकार लॉन्सजवळील काटवण परिसरात पहाटे छापा टाकला. त्यावेळी काही जण गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

अब्दुलनूर जब्बार कुरेशी (२०), इमाम हुसेन शेख (२८) आणि अहमद फारून शहा (३२) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत या अवैध कत्तल प्रकरणातील आणखी सहा साथीदारांची नावे समोर आली असून ते फरार आहेत.

जप्त मुद्देमाल

– ३१०० किलो गोमांस – किंमत ₹९.३० लाख

– एक पिकअप वाहन – किंमत ₹६ लाख

– चार मोबाईल फोन – किंमत ₹५५ हजार

– सुरा, कुऱ्हाड व इतर साहित्य

एकूण जप्त मुद्देमाल : ₹१५,८५,५००

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!