प्रवरा नदीपात्रालगत बेकायदा हातभट्टीवर संगमनेर शहर पोलिसांचा छापा ; ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर प्रतिनिधी – 

संगमनेर शहर पोलिसांनी कसारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत सुरू असलेल्या बेकायदा गावठी हातभट्टीवर छापा टाकून ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता प्रवरा नदीच्या पात्रालगत, म्हसोबा मंदिराच्या पाठीमागील काटवनामध्ये ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी प्रमोद प्रभाकर बर्डे (रा. कसारा दुमाला, ता. संगमनेर) हा विनापरवाना बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६०० लिटर कच्चे रसायन (किंमत ४२ हजार रुपये), १०० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू (किंमत १० हजार रुपये) तसेच अंदाजे ५० लिटर जळके रसायन (किंमत ३ हजार ५०० रुपये) असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ), (क), (ड) व (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!