राहुल गांधी हे बाबराचे वंशज….

सोशल मीडियावर टिप्पणी करणाऱ्या शाम तिवारीवर गुन्हा दाखल  

 संगमनेर प्रतिनिधी —

सध्या संगमनेर शहरात सोशल मीडियावरील टीका टिपण्या हा ऐरणीवरचा विषय असून एकमेकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करणे आणि गुन्हे दाखल करणे सुरू झाले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या ग्रुपवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत ‘राहुल गांधी हे बाबराचे वंशज आहेत’ अशी टिप्पणी केली म्हणून संगमनेर शहरातील देवाचा मळा या ठिकाणी राहणारे शाम तिवारी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश तुकाराम कडलग (राहणार शिवाजीनगर, संगमनेर) यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी सौ शहरी एक संगमनेरी या व्हाट्सअप ग्रुप वर सदस्य असून या ग्रुपचे ॲडमिन संजय क्षत्रिय हे आहेत. या ग्रुप वर अजित मणियार यांनी टाकलेल्या पोस्टला शाम तिवारी (राहणार देवाचा मळा, संगमनेर) यांनी राहुल गांधी यांचे बाबत टीका टिप्पणी करताना ‘राहुल गांधी हे बाबराचे वंशज आहे’ असा बदनामीकारक उल्लेख करून त्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल करत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!