संगमनेर शहरात कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा !….
कर्तव्यात कसूर करणाऱ्या शहर पोलिसांवर पोलीस अधीक्षक कारवाई का करत नाहीत, जनतेचा सवाल
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील मोगलपुरा भागात असणाऱ्या अवैध कत्तलखान्यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने छापा टाकून 120 किलो गोमांस जप्त केले आहे. नगरच्या पथकाकडून कारवाई होत असली तरी संगमनेर शहर पोलीस मात्र आपल्या कर्तव्यापासून चार हात दूरच असल्याचे वारंवार उघड होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी ठेवून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला विचारला जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार गणेश लबडे, दिपक घाटकर, विजय पवार, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे या पथकाने ही कारवाई केली आहे.

संगमनेर शहरामध्ये पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मजरेहक मोहमंदनदीम कुरेशी (रा. मोगलपुरा संगमनेर) हा साथीदारासह राहत्या घराच्या शेजारी खोलीमध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करत आहे. पथकाने तात्काळ छापा टाकला असता सदर ठिकाणी एक खोलीमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचे दिसुन आले.
1) मजरेहक मोहमंदनदीस कुरेशी (वय-28 वर्षे रा. मोगलपुरा, खाटीक गल्ली, संगमनेर,) याच्या बाब्यातून 36,000/- रुपये किमतीचे 120 किलो गोमांस,1000/-रु कि.चे लोखंडी सुरी, सत्तुर, कुऱ्हाड असा एकुण 37,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 342/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271,325,3(5) प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 5(क), 9, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
