रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर अजिंक्य सोनांबेकरडॉक्टर अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल…!

उपचारात हलगर्जीपणा : सिव्हिल सर्जन यांचाही अहवाल 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णावर व्यवस्थित उच्चार न करता निष्काळजीपणा व बेदरकारपणाने उपचार केल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून संगमनेर येथील डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर आणि डॉक्टर अभिजीत भाऊसाहेब कोरडे या दोन नामांकित डॉक्टरांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील दत्तात्रय दळवी यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका या दोन्ही डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. दळवी यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना संगमनेर शहरातील डॉक्टर सोनांबेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र या ठिकाणी उपचार करत असताना वैद्यकीय उपचाराच्या दरम्यान हलगर्जी पणा केल्यामुळे सदर रुग्णाची अवस्था गंभीर झाली आणि उपचाराची व्यवस्था असूनही सदर रुग्णाला बाहेर गावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. या सर्व प्रकारामुळे त्या रुग्णाची हेळसांड झाली आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिव्हिल सर्जन यांच्या अहवालातही अनेक त्रुटी झाल्याचा निष्कर्ष 

मयत दत्तात्रय नामदेव दळवी यांच्यावर डॉक्टर सोनंबेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या हॉस्पिटलमध्ये नेफरोलॉजी स्पेशालिटी अंतर्गत व किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असतानासुद्धा उपचार करण्यात आले नाहीत. त्या उपचाराअभावी सदर मयत दत्तात्रय नामदेव दळवी या रुग्णाला नाशिक येथे दोन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुचविण्यात आले.

डॉक्टर सोनंबेकर हॉस्पिटल यांनी मयत दळवी यांना आजारासंबंधीने उपचार करणे आवश्यक होते. पण तसे न करता सोनंबेकर हॉस्पिटल यांनी दळवी यांना जाणीवपूर्वक डिस्चार्ज दिला. सोनांबेकर हॉस्पिटल मार्फत सदर रुग्णावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ट्रीटमेंट केली व या कारणामुळे सदर रुग्णाला नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जो खर्च आला तो सर्व खर्च सोनांबेकर हॉस्पिटलच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डॅनियल ऑफ ट्रीटमेंट या कारणामुळे आला. तरी सदर सोनांबेकर हॉस्पिटल वर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे अंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदवून रुग्णाला इतर रुग्णालयात झालेला सर्व खर्च परत देण्यात यावा असा निष्कर्ष देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!