गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी हद्दपार !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

गुन्हेगारी टोळी तयार करुन टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी राहाता तालुक्यातील ममदापुर व लोणी परिसरात सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता गैर कायदयाची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागविणे, गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसची वाहतूक करणे व इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात आणणे असे गुन्हे सराईतपणे करणाऱ्या टोळीला हद्दपार करण्यात आले आहे.

टोळी प्रमुख (1) फैजान जब्बार कुरेशी (शेख), वय 25 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला,ममदापुर,ता.राहाता,जि. अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) मुन्तजीर मुनिर कुरेशी, वय 23 वर्षे, रा.सदर (3) अब्दुलकरीम अमिर कुरेशी, वय 52 वर्षे, रा.सदर (4) मुनिर अमिर कुरेशी, वय 56 वर्षे, रा.सदर, (5) जब्बार हसन कुरेशी (शेख), वय 23 वर्षे, रा.सदर, (6) नाजीम आयुब कुरेशी, वय 33 वर्षे, रा.सदर (7) वसीम आयुब कुरेशी, वय 27 वर्षे, रा.सदर (8) रिजवान महेबुब कुरेशी, वय 25 वर्षे, रा.सदर अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.

टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन 2021 ते 2025 मध्ये सराईतपणे विविध गुन्हे केले असून प्रतिबंध कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. 

सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीच्या गैरकृत्यांना आळा बसणार नव्हाता. तसेच लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांच्या विरुध्द कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची अमोल भारती, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग,जि. अहिल्यानगर यांनी चौकशी करुन शिफारशीसह चौकशी अहवाल सादर केला. सदर प्रस्तावाची सखोल चौकशी करुन त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून 18 महिन्यांकरीता हद्यपार केल्याचे आदेश पारीत केलेले आहेत.  

अहिल्यानगर जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील शरीराविरुध्दचे, मालाविरुध्दचे, गोवंशीय कायदयान्वये गुन्हे करणारे, भारतीय हत्यार कायदयान्वये तसेच वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीची माहिती संकलीत करुन त्यांच्या विरुध्द हद्दपारची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार टोळीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असून त्यांच्या विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!