जुगार अड्डयावर छापा… 21 जणांवर गुन्हा दाखल 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तिरट जुगार खेळण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून 21 जणांवर कारवाई केली आहे. या ठिकाणी 4 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागडपट्टी, ढोणे गल्ली या ठिकाणी जुन्या वाड्याच्या भिंतीच्या आडोशाला काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले.

पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 1) संजीव रामचंद्र राऊत रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 2) अमर रुपा छाडेकर रा. पारधी, ता. जामनेर, जि. जळगांव, 3) गणेश प्रल्हाद चोभे रा. बागडपट्टी ता. जि. अहिल्यानगर, 4) राहुल प्रकाट भट रा. तेलीखुंट, ता. जि. अहिल्यानगर, 5) यशवंत पंढरीनाथ ढोणे रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 6) हेमंत गणेश गायकवाड रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापुर, 7) समाधान श्रीमंत सुरवसे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 8) जिजाबा रखमाजी भोसले रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापुर, 9) अशोक विश्वनाथ चोभे रा. केडगांव, ता. जि. अहिल्यानगर, 10) विशाल रोहिदास नाकाडे रा. कोठी, माळीवाडा, ता. जि. अहिल्यानगर, 11) प्रेमशंकर गणेशलाल कश्यप रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 12) मोहन दत्तु गोरे रा. बागडपट्टी ता. जि. अहिल्यानगर, 13) सतिष परशुराम जेजुरकर रा. लोंढे मळा, केडगांव, ता. जि. अहिल्यानगर, 14) अशोक बबन घोगरे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 15) तुषार अशोक लड्डा रा. अडतेबाजार ता. जि. अहिल्यानगर, 16) सुरज अशोक यादव रा. भिसेगांव, ता. कर्जत, जि. रायगड, 17) श्रीमंत निवृत्ती सुरवसे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 18) जिशानखान मंजुरखान पठाण, रा. बेलदार गल्ली, ता. जि. अहिल्यानगर, 19) अमोल महादेव कांबळे रा. राशीन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, 20) राजु रामदास जगताप रा. राशिन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, 21) रिंटु नंदेलाल महातो रा. विहार अशांना ताब्यात घेतले आहे. 

ताब्यातील इसमांकडून 4,93,880/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, 20 मोबाईल, जुगाराची साधने जप्त करण्यात आली आहेत. आरोपीविरुध्द तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं.83/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.  

पो.नि. ज्योती गडकरी नेम – सुपा पोलीस ठाणे, पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे, कल्याण लगड, सारंग वाघ, गणेश डोंगरे, प्रशांत दिवटे, योगेश सातपुते, विशाल कुलकर्णी या पथकाने ही कारवाई केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!