संगमनेरात महिलेचे मंगळसूत्र चोरले !

 संगमनेर प्रतिनिधी 

संगमनेर शहरात विविध प्रकारच्या चोऱ्या करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी असे प्रकार तर नेहमीच होत आहेत. मंगळसूत्र चोर, चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बस स्थानक परिसरातल्या चोऱ्या वाढत असतानाच मंगळसूत्र गंठण चोरी सुद्धा थांबलेली नाही.

संगमनेर शहरात पुन्हा मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडला असून शहरातील गजबजलेल्या हनुमान शरण कॉलनी, मालदार रोड या परिसरात एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र तोडून नेण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून अज्ञात चोरट्यांनी पलायन केले आहे.

सुनिता अशोक गुंजाळ (राहणार हनुमान शरण कॉलनी, मालदार रोड, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून मोटार सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमानी गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मंगळसूत्राची किंमत पोलीस दप्तरी 90 हजार रुपये दाखवण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत. 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!