अमली पदार्थ (एमडी) विक्री करणारा पकडला…!
एलसीबी, जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
एमडी या अमली पदार्थाचे विक्री करण्यासाठी जामखेड शहरात येणाऱ्या एका ड्रग तस्कराला एलसीबी आणि जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले असून या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून दोन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी हा मोटार सायकलवर एम.डी.नावाचा अंमली पदार्थ विक्री करीता जामखेड ते कर्जत रोडलगत वैशाली वुड फर्निचर दुकाना समोर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीला घटनास्थळी पकडले आणि त्याची अंग लढते घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत एमडी नावाचा अमली पदार्थ म्हणून आला हा आपले पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतला.

मंगेश हिरामन पवार (वय- 30 वर्षे रा. कान्होपात्रानगर, जामखेड ता.जामखेड) मकसुद बागवान रा. करमाळा जि. सोलापुर (फरार) अशी घटनेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी पवार याला पोलिसांनी अटक केली असून बागवान हा फरार आहे.
पोउपनि/ समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावढे, तर पोलीस अंमलदार देविदास पळसे, एम.टी.मिसाळ (नेम. जामखेड पोलीस स्टेशन) या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोपीच्या ताब्यातून 1, 23, 400/-रु कि.चा 6.17 मिली मॅफेड्रॉन (एम.डी) नावाचा अंमली पदार्थ, 100,000/-रु कि. एक मोटार सायकल असा एकुण 2 लाख 23 हजार 400/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/2159 ह्रदय गौतम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु. र. नं. 83/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
