अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडले 

अकोले – संगमनेरच्या तिघांवर गुन्हा दाखल दोघे ताब्यात, एक फरार 

श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणार असल्याची खबर मिळाल्यानंतर श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने कारवाई करीत सापळा रचून एका स्विफ्ट कार मधून अवैध दारू जप्त केली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक जण फरार आहे. आरोपींमध्ये एक अकोल्याचा तर दोघेजण संगमनेरचे आहेत. 

अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकाला धामणगाव पाट ते कोतुळ जाणाऱ्या रोडवर एका स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच 05 बी एक्स 56 35 मधून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पथक धामणगाव पाट ते कोतुळ जाणाऱ्या रस्त्यावर हायटेक नर्सरी या ठिकाणी सापळा रचून थांबले असता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर गाडी आली असताना पथकाने सदर गाडी थांबवून त्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये देशी दारू च्या बॉबी संत्रा या 924 बाटल्या मिळून आल्या. त्याची अंदाजे किंमत 61 हजार 950 रुपये अशी आहे. तर स्विफ्ट कार आणि दोन मोबाईल असा एकूण चार लाख 81 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

अक्षय मारुती वाकचौरे (वय 26 वर्ष राहणार परखतपूर तालुका अकोले) राजेंद्र बाळासाहेब तांबे (वय 30 वर्ष राहणार पेमगिरी तालुका संगमनेर) आणि अभिजीत रणशूर (राहणार संगमनेर, फरार) अशा तीन आरोपींची नावे असून सदर माल हा संगमनेर येथील अभिजीत रणशूर याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. अकोले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.

पोलीस हवालदार अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांच्यासह इतर सहकारी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!