संगमनेरात खंडोबा मंदिराची दानपेटी फोडली !

 पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरली 

 संगमनेर | प्रतिनिधी —

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथील खंडोबा मंदिराच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या असून या दानपेटीतून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. 

सुदाम कारभारी बोऱ्हाडे (गोडसेवाडी धांदरफळ खुर्द तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. देवगाव येथील खंडोबा मंदिराच्या गेटचे कुलूप उचकटून मंदिरात प्रवेश करून दोन दान पेट्यांमध्ये असलेली अंदाजे रोख रक्कम 50 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल डुंबरे या तपास करीत आहेत. 

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!