संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा एलसीबी चा छापा…
११ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल ; ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 11 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. संगमनेरातील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखेची सातत्याने कारवाई सुरू आहे. मात्र ज्यांची जबाबदारी आहे ते संगमनेर शहर पोलीस अशी कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शहर पोलिसांचा हलगर्जीपणा उघड होत आहे. वरिष्ठांकडून याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

आज दिनांक 10/02/2026 रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राजवाडा, बुध्दविहार समोर, मोगलपुरा संगमनेर येथे अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी (रा.मोगलपुरा संगमनेर) व सलिम रियाज कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर) कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी ठिकाणी छापा टाकला असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमास टेम्पोमध्ये भरतांना दिसून आले. पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असतांना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले. सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असतांना पकडण्यात आले.

1) फैज अशपाक कुरेशी (वय – 22 वर्षे रा. गल्ली नं.02 मदिनानगर संगमनेर) 2) सद्दम मोहमद जावेद कुरेशी (वय- 29 वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर) 3) कलिम सलीम सय्यद (वय – 36 वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा संगमनेर) 4) मुलमफरिद जावेद कुरेशी (वय -32 वर्षे रा. मोगलपुरा जुना राजवाडा संगमनेर) 5) अनस गुलामसरवर कुरेशी (वय-21 वर्षे रा. अलकानगर संगमनेर) 6) फैसल जाकिर कुरेशी (वय- 20 वर्षे रा. गल्ली नं.1 मदिनानगर संगमनेर) 7) जुनेद आयाज कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर) पळून गेलेल्या इसमांची नावे 8) अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी (रा. मोगलपुरा संगमनेर (फरार), 9) सलिम रियाज कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर (फरार), 10) हाशमी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी (रा. मदिनानगर संगमनरे 11) टाटा टेम्पो क्र.एच.एच.14 सी.डी.0839 चे मालक (माहिती नाही) (फरार) अशी आरोपींची नावे आहेत.

सदर ठिकाणावरुन 5,40,000/- रुपये किमतीचे 1800 किलो गोमांस, 5,50,000/- रुपये कि.चा टाटा कंपनीचा टेम्पो, 12,000/- रु कि.चा एक रिक्षा, 1000/- रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा व 3000/- रुपये किमतीचे 01 लोखंडी कु-हाड, दोन चाकु, एक काणस असा एकुण 11,06,00/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 136/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, (ब), 5 (क), 9, 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दिपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत आढाव, चालक महादेव भांड या पथकाने ही कारवाई केली आहे.
