डिग्रस शिवारात वाळू तस्करी पकडली !

20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावच्या शिवारात वाळू तस्करी करणारे पकडले असून त्यांच्याकडून वाळूसह डंपर व इतर वाहने जप्त करून 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

डिग्रस ते ठाकरवाडी जाणाऱ्या रोडवरील मेंगाळवस्ती, डिग्रस, ता. संगमनेर
जि. अहिल्यानगर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

फिरोज सुलतान शेख आणि प्रकाश भाऊसाहेब कोरडकर या दोघांच्या ताब्यात सदर वाहने आणि वाळू असल्याचे आढळून आले. या दोघांकडून ही वाहने आणि वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश जबाजी कर्डीले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) 5,00,000/- रु. किं. चा एक टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा निळ्या रंगाची केबीन व विटकरी रंगाचा हौदा असलेल ढंम्पर, हौद्याच्या पाठीमागील बाजूस एम.एच.12.ई.क्यु.6334 असा नंबर असलेला जु.वा. किं.अं. (प्रकाश भाऊसाहेब कोरडकर याच्या ताब्यात मिळून आला)
2)20,000/- रु.किंची अंदाजे 02 ब्रास वाळु वरील मुद्देमाल क्रं. 1 मधिल टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा ढंम्पर क्रं.एम.एच.12.ई.क्यु.6334 चे हौद्यामध्ये मिळून आलेली कि.अं.
3)15,00,000/- रु. किं. चा एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा 912 मॉडेलचा पिवळ्या रंगाची केबीन व राखाडी रंगाचा हौदा असलेला ढंम्पर, त्याचा चेसीज नं. MAT786009P7319652 असा असलेला जु.वा.किं.अं. (फिरोज सुलतान शेख याच्या ताब्यात मिळून आला.)
4)20,000/- रु. किंची अंदाजे 02 ब्रास वाळु वरील मुद्देमाल क्रं. 3 मधिल विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा 912 मॉडेलचा ढम्पर त्याचा चेसीज नं. MAT786009P7J19652 चे हौद्यामध्ये मिळुन
आलेली किं. अं.
असा एकूण 20,40,000/- रु. मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!