संगमनेर तालुका पोलीस हद्दीत जबरी चोरी !

9 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरासह तालुक्यात सर्व ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. घरफोडी जबरी चोरीचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी 9 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे.

संगमनेर तालुक्यातील देव कौठे या गावात राहत्या घरातील लाकडी कपाट तोडून लॉकर मधील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम आणि फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम असा एकूण 9 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. 

सुनील वसंत गुडघे (राहणार देव कौठे, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!