संगमनेरातील सहा आरोपींना संघटित गुन्हेगारीचे कलम लावले… 

 जन्मठेपेपर्यंत होऊ शकते शिक्षा..!

 श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

संघटितपणे टोळी बनवून अनेक गुन्हे करणाऱ्यांवर बीएनएस च्या कायद्यातील नवीन कलमान्वये संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सराईत आरोपींवर संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्यात आले असून या कलमानुसार सदर आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तसे आदेश दिले आहेत.

१) अलिम अकबर पठाण २) वसीम मन्सुर शेख, ३) निलेश बाळासाहेब शेळके, ४) सलमान अकबर पठाण ५) अनमोल कुरनवाशी चव्हाण ६) सलिम अकबर पठाण (सर्व रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपीविरुध्द अनेक गुन्हे दाखल असून नमुद गुन्हयास भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या नविन कायदयाप्रमाणे कलम १९१ या वाढीव कलमा करीता उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्याकडून अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर येथे प्रस्ताव पाठवीण्यात आला होता. सदर प्रस्तावा नुसार सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी अवलोकन केले असता सदर गुन्हयातील आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता संघटीत टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याने भारतीय न्याय संहीता २०२३ या कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे. संघटीत गुन्हेगारी संघाचा एक सदस्य म्हणुन किंवा या संघाच्या वतीने हिंसाचाराचा हिंसाचाराची धास्ती, धमकी, धाकदपटशा किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर मार्गानी वित्तीय लाभासह भोतिक लाभ, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्राप्त करुन संघटीत गुन्हेगारी करुन बेकायदेशीर कृती चालू ठेवली आहे.

यामुळे संगमनेर शहर पो.स्टे. गु.र.नं. ११८ / २०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० ( ६ ) प्रमाणे दाखल गुन्हयांस भारतीय न्यायसंहिता २०२३ चे नविन कायदयाप्रमाणे कलम १११ अन्वये वाढीव कलम लावण्याबाबत अपर पोलीस अधीक्षकांनी परवाणगी दिली आहे. नवीन कायदयाप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम १९१ हे संघटीत गुन्हेगारी साठी नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. मोक्का कायदयाप्रमाणे संघटीत गुन्हेगारीसाठी असणारी शिक्षा या कलमात नमुदbकेलेली आहे. त्यानुसार सदरची शिक्षा ही जन्मठेप पर्यंत आहे. आरोपींनी यापुर्वी एकत्रितपणे मिळून २ किंवा जास्त गुन्हे केले असल्यास सदरचे कलम लावण्यात येते. सदर कलम गुन्हयात लावण्याची परवाणगी पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधिक्षक, दर्जाचे अधिकारी देतात. गुन्हा घडल्यापासुन यातील आरोपी जेलमध्ये असून हे कलम वरील गुन्हयात लावल्यामुळे किमान १ वर्ष तरी आरोपींना जामीन होण्याची शक्यता नाही. सदरचे कलम या गुन्हयास लावले नसते तर आरोपी ८/१० दिवसात जामीनावर बाहेर आले असते. नवीन कायदयाची प्रभावी अंमलबजावणी यातून केली आहे.

सदरची कारवाई ही सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. समिर बारवकर, पोसई पगारे, पोहेकॉ सातपुते, पोहेकॉ खेडकर व पोकॉ खुळे संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!