कळस बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी !
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील कळस बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ढोल,ताशाच्या गजरात मानवंदना तर डीजे च्या तालावर मिरवणूक काढून अन सामाजिक बांधिलकी तुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कळस बु. येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, शिवप्रेमी तरूण मित्र मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत येथे सरपंच राजेंद्र गवांदे, नामदेव जाधव यांचे हस्ते शिवपुतळ्याची पूजा तर उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे व छत्रपती युवा प्रतिष्ठान चे सागर वाकचौरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी सैनिक मनोहर हुलवळे व भारत भोर, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली.

यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता चौधरी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष नामदेव निसळ, रामदास वाकचौरे, ग्रामसेवक कचरू भोर यांचे शुभेच्छा पर भाषणे झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे, विजय वाकचौरे, संगीता भुसारी, कल्याणी कानवडे, छत्रपती युवा प्रतिष्ठान चे युवक, ग्रामस्थ यांच्या वतीने महाराजांना नमन करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शिवप्रतिमा मिरवणुक पार पडली. जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला, मुलांचे भाषणे झाली. मुख्याध्यापक एकनाथ दिघे, भागवत कर्पे, संजय शिंदे ,अनाजी मुठे स्मिता धनवटे, माधवी गोरे, सुनंदाकातोरे, सपना पांडे, संगीता दिघे, सुवर्णा जाधव, चैताली लोंढे, बबिता शिंगोटे यांनी आयोजन केले होते.
गावातील तरूण मित्रमंडळांने आयोजित केलेल्या कार्यक्रम स्थळी सदर मिरवणुकीचे स्वागत करण्यात झाले.

त्यानंतर रक्तदान शिबिर प्रारंभ झाला. सायंकाळी भव्य मिरवणुक पार पडली. यावेळी हभप गणेश महाराज वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य केतन वाकचौरे, सचिव गणेश रेवगडे, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शिवाजी वाकचौरे, मुख्याध्यापक एकनाथ दिघे, राहुल बालोडे, राहुल वाकचौरे, अजित वाकचौरे, अजिंक्य कातोरे, सागर वाकचौरे तरूण वर्ग उपस्थित होते.
