107 वर्षांची परंपरा असलेली राजापूर येथील जिल्हा परिषद शाळा आरजीएसएस च्या कार्यकर्त्यांनी केली चकाचक !

संगमनेर | प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर येथे राहुल गांधी समर्थक संघाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीमेचा प्रारंभ केला आहे.

राजापूर येथील शिक्षक पालक समितीचे सदस्य अरुण चव्हाण यांच्या पुढाकाराने व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर यांच्या *अग्निझुंज* च्या मदतीने 107 वर्षे जुनी व स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली वास्तू आज पाण्याने धुवून काढण्यात आली. 

बऱ्याच दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेली ही इमारत रस्ता व पटांगणातील धूळ व झाडांच्या पालापाचोळ्याने काहीशी अस्वच्छ झाली होती. 

आज RGSS च्या टीमशी अरुण चव्हाण यांनी संपर्क केला असता टीम च्या वतीने समन्वयक अमोल शेलकर व राम अरगडे यांनी कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग घुले व संचालक संतोष हासे, लताताई गायकर यांच्याकडे सहकार्याची विनंती केली असता त्यांनी तात्काळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर स्वच्छतेसाठी अग्निशामक दलातील अग्निझुंज उपलब्ध करून दिली.

बऱ्याच वर्षानंतर अग्नीशामकच्या साहाय्याने होणारी स्वच्छता पाहून शाळेच्या मुख्याध्यापक राधाबाई विठ्ठल आरोटे यांनी RGSS व साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे पुष्पगूछ देऊन आभार मानले. यावेळी राजापूर गावच्या सरपंच सौ कुसुमताई पानसरे, ग्रामसेवक भाऊसाहेब भांड, इतर उपक्रमशील शिक्षक, RGSS समन्व्यक अरुण चव्हाण,|अमोल शेलकर, राम अरगडे व इतर सदस्य उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!