संगमनेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा निर्धार ; पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक भगव्याखालीच लढविणार !

संगमनेर | प्रतिनिधी –

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी व शिवसैनिकांशी थेट संवाद साधताना आपसातील मतभेद व मनभेद बाजूला ठेवा असे आवाहन उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी केले.. आता फक्त शिवसेना ! असे सांगत आगामी निवडणुका या भगव्याखालीच लढविल्या जातील असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले असून शिवसेनेकांनी ही निवडणूक भगव्या खालीच लढवण्याचा निर्धार केला आहे.

पदाधिकारी नेमणुकांबाबत बोलताना कोते यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींचे निर्णय अंतिम असतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत असून, या दोन्ही बंधूंंकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे बदल हे पक्षासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार असून, त्याच जोरावर सत्तेवर भगवा झेंडा रोवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना शिष्टमंडळ भेटून लवकरच निर्णय घेण्यासाठी विनंती केली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करत निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली.

तळेगाव भागाचे युवा सेना तालुकाप्रमुख सागर भागवत यांनी देखील जिल्हा परिषद निवडणूक साठी इच्छुक असल्याचे सांगितले. पक्षप्रमुखांनी दिलेले आदेश सर्वांना ला मान्य असून जो निर्णय पक्षप्रमुख घेतील, तोच आमचा अंतिम निर्णय असेल. आम्ही कडवे शिवसैनिक आहोत एकनिष्ठ, एकजूट आणि लढवय्ये हीच आमची ओळख आहे असे ठामपणे सांगत त्यांनी आगामी प्रत्येक राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. 

नगर पालिकेतील निवडणुकांच्या धर्तीवर पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्येही शिवसेनेच्या माध्यमातून परिवर्तन घडणारच असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, हेवेदावे, गटबाजी आणि अहंकार बाजूला सारून पक्षाची वज्रमुठ आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. शिवसेनेची ताकद, भगवा झेंडा आणि शिवसैनिकांची निष्ठा यांच्या बळावर पंचायत समिती व जिल्हा परिषदांवर विजयाचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारच सर्वांनी व्यक्त केला. 

या बैठकीत शिवसेना पक्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ, उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते, तालुकाप्रमुखूप भाऊसाहेब हासे, माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, तालुका युवाध्यक्ष अक्षय गुंजाळ, युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, अजीज मोमीन, महिला आघाडीच्या उप जिल्हाध्यक्षा आशाताईं केदारी, सुनील देशमुख, प्रकाश क्षत्रिय, योगेश गुंजाळ, संदीप गुंजाळ, प्रकाश गायकवाड, रंगनाथ फटांगरे, भीमा पावसे, अमित फटांगरे, अशोक बडे, संजू सोनावणे, संदेश देशमुख, भाऊसाहेब वराळे, अमोल डुकरे, बाळासाहेब कवडे, राजू सातपुते, स्वप्नील उदावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!