नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा — आमदार खताळ
संगमनेर नगरपालिका, पोलीस व प्रशासनाला दिल्या सूचना
संगमनेर | प्रतिनिधी —
शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणार्या विक्रेत्यावर तातडीने कारवाई करावी.विक्रीसाठीआलेला नाॅयलाॅन मांजा जप्त करावा आशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत.

नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. तसेच या मांजामुळे नागरिक मुले जखमी होण्याच्या घटना घडल्याचे गांभिर्य सुध्दा मोठे आहे. हा मांजा जीवघेणा असून त्याचा वापर, तसेच साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ देऊ नका अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

शहराच्या उपनगरामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या सर्वच दुकानदारांना सूचना द्याव्यात विक्री करणार्या व्यावसायिकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी. नायलॉन मांजा जप्त करून संबंधित दुकानदारांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना खताळ यांनी दिल्या आहेत. नायलॉन मांजमुक्त संगमनेर घडवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे.
