नवीन लोकप्रतिनिधीचा ‘बनवाबनवी’ चा खेळ — शंकरराव खेमनर

तालुक्यात एकही विकासकाम नाही, फक्त पत्रक बाज

महायुती सरकारच्या तिजोरीत खडखडाट हे जनतेला माहीत आहे…

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर विधानसभा मतदारसंघात 171 गावे आणि 258 वाड्या वस्त्या आहेत ही गावे अजून नवीन लोकप्रतिनिधीला माहित सुद्धा नाहीत. मागील एक वर्षांमध्ये एक रुपयाचाही निधी आणता आलेला नाही. नवीन लोकप्रतिनिधी कडून निधीबाबत खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केला असून राज्याच्या तिजोरीमध्ये असलेला खडखडात जनतेला माहीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खेमनर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नवीन लोकप्रतिनिधी यांनी ८४८ कोटी रुपयांचा निधी तालुक्यात आल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे वस्तुतः हे सर्व खोटे आहे. इतका निधी एका तालुक्याला तर मग तालुक्यात विकास कामे का दिसत नाही हा साधा प्रश्न आहे.

नवीन लोकप्रतिनिधीला मागील एक वर्षांमध्ये एकही निधी आणता आला नाही जो निधी आला तो लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातील आहे त्यांच्याच पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न यांनी केला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी सुमारे 100 कोटींचा निधी मंजूर करून ठेवला. मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर हे सर्व कामे रखडवली गेली. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे काम 2021 मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केले होते तर स्वतंत्र महिला हॉस्पिटल साठी 2020 मध्येच मंजुरी आली आहे.

साकुर पठार भागामध्ये उपसा सिंचन योजना बाबत खोटी माहिती पसरवली जात असून एमआयडीसीसाठी सुद्धा लोक नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केला आहे. हे सर्व सुत आहे. मागील एक वर्षांमध्ये संगमनेर तालुका व शहरांमध्ये आपली पदार्थांची तस्करी, दहशत गुंडगिरी वाढली आहे. याचबरोबर तालुक्याची रेल्वे पळवली गेली याचे उत्तर खरे तर नवीन लोकप्रतिनिधी दिले पाहिजे. विकास कामे तर नाही परंतु संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहे.

विविध कल्याणकारी योजनांचे गोरगरिबांचे पैसे रखडले आहेत. रस्त्यांची कामे रखडली आहेत. कोणतीही ठोस काम होत नाही. फक्त फ्लेक्स बाजी आणि जाहिरात बाजी सुरू आहे. आणि याला जनतेने नगर परिषदेच्या निवडणुकीतून उत्तर दिले आहे. खोट्या बातम्या प्रसिद्ध करून जनतेला भुलथापा देण्याचा प्रयत्न संगमनेरकर कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे सांगताना नवीन कामे करा, नवीन निधि आणा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

तालुक्यात एक तरी नवीन काम दाखवा — हा तर ‘बनवाबनवी’ चा खेळ 

राज्याच्या तिजोरीत खडखडात आहे. कोणत्याही विकास कामांना निधी दिला जात नाही. विकास कामे रखडली आहेत, असे असताना इतका मोठा निधी जर संगमनेर तालुक्यात आला तर तो कुठे गेला हा प्रश्न आहे. त्यामुळे महायुतीच्या नवीन लोकप्रतिनिधीचा बनवाबनवी चा खेळ संगमनेर संगमनेर तालुक्यातील जनता ओळखून असल्याचे सभापती खेमनर यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!