युरियाचा तुटवडा ; शेतकरी त्रस्त

तातडीने युरिया उपलब्ध करून द्या —

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी

संगमनेर प्रतिनिधी —

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाकडे मागणी करताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सातत्याने विविध संकटांचा सामना करत असतो. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे .त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी रब्बी पीक मोठ्या प्रमाणात केले आहे . कांदा, मका, हरभरा, गहू, ही पिके मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. मात्र युरियाचा तुटवडा झाला आहे. कि हा तुटवडा कृत्रिम निर्माण केला जात आहे याची चौकशी सरकारने केली पाहिजे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे. किंबहुना सरकारची ती जबाबदारी आहे. काँग्रेस आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांची काळजी घेतली. कायम शेतकऱ्यांना मदत केली ही आठवण ही त्यांनी करून दिली.

संगमनेर तालुक्यातही शेतकऱ्यांची युरियासाठी मोठी मागणी असून कृषी विभाग आणि शासनाने वेळेत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आवश्यक तेवढी युरिया पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.

याचबरोबर निवडणूक पूर्व काळामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले . त्यामधील अनेक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई सुद्धा अद्याप मिळाली नाही. शेतमालाला भाव नसून शेतकरी अडचणीत आहे म्हणून सरसकट कर्जमाफी केलीच पाहिजे.

याचबरोबर तातडीने युरिया उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

युरियाच्या तुटवड्याने शेतकरी त्रस्त

सध्या रब्बी हंगाम सुरू असून विविध पिकांसाठी युरियाची मोठी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे .मात्र युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे युरिया तातडीचे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!