केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार बंसल यांची थोरात कारखान्यास भेट
थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम देशासाठी दिशादर्शक – पंकज कुमार बंसल
संगमनेर प्रतिनिधी —
महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. अनेक ठिकाणी सहकार अडचणीत असताना संगमनेरच्या सहकार चळवळीने शिस्त पारदर्शकता आधुनिकतेचा वापर करा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केल्या असून संगमनेरचा हा पॅटर्न देशासाठी दिशादर्शक असल्याचे मत केंद्रीय अतिरिक्त सचिव पंकज कुमार बंसल यांनी व्यक्त केले आहे.

भारत सरकारच्या सहकार विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार बंसल (IAS) व त्यांच्या सौभाग्यवती जी. ललिता (IAS कर्नाटक) यांनी थोरात सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी समवेत एनसीडीसी चे डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री, प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, मदन आंबरे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, सुंदराबाई दुबे, रावसाहेब दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, अशोक मुटकुळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीमध्ये बंसल दाम्पत्यांनी कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह कामकाज पद्धती, को जनरेशन, इथेनॉल प्रकल्प, राजहंस शर्करा यांची पाहणी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.
बन्सल म्हणाले की, महाराष्ट्राचा सहकार पॅटर्न हा देशांमध्ये मार्गदर्शक ठरणार आहे. सहकारामुळे ग्रामीण समृद्धी निर्माण झाली असून संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी सहकार अडचणीत असताना संगमनेरने वापरलेल्या शिस्त, पारदर्शकता व आधुनिकता या त्रिसूत्रींचा वापर इतर ठिकाणी करणे गरजेचे आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याबरोबर सर्व सहकारी संस्था अत्यंत आदर्शवत काम करत असून संगमनेरचे हे मॉडेल देशासाठी अनुकरणीय आहे. कारखान्याने राबवलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक केले असून कारखान्याची नवीन अद्यावत प्रशासकीय इमारत ही देशातील सुसज्ज अशी एकमेव ठरणारी वास्तु असल्याचे ते म्हणाले यावेळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून नवीन कार्यालयाची पाहणी केली.

पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारातून समृद्धी निर्माण करताना सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल यासाठी येथे काम होत आहे. दरवर्षी सातत्याने उच्चांकी भाव दिला जातो कारखान्याने पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करून 5500 मे.टनाचा नवीन कारखाना व 30 मेगा वॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारला असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
