अमली पदार्थ आणि त्या आडून सुरू असलेले वसुलीचे टोलनाके थांबवायचे आहेत — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सेवा समिती संगमनेर करांच्या विकासासाठी कटिबद्ध राहील

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे. संगमनेर तालुक्यातील जनता कधीही इतरांपुढे लाचार होणार नाही. विकास कामे करत राहू याचबरोबर रेल्वे सुद्धा खेचून आणू असे सांगताना संगमनेर मध्ये सुरू झालेली अमली पदार्थांची तस्करी व त्या आडून असलेले वसुलीचे टोल नाके बंद करण्यासाठी संगमनेरकर एकवटले आहेत. आगामी काळामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सर्व उमेदवार कटिबद्ध रहातील असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर शहरात सेवा समितीच्या वतीने भव्य प्रचार रॅली झाली या प्रचार रॅलीची सांगता लालबहादूर शास्त्री चौक येथे झाली. या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. माधवराव कानवडे, उत्कर्षा रुपवते, रणजीतसिंह देशमुख, अमर कतारी, संजय फड, सोमेश्वर दिवटे, दिलीप पुंड विश्वास मुर्तडक यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, संगमनेर शहरात आजची रॅली ही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक झाली जनतेचा मोठा उत्साह आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार सक्षम असून आपल्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहतील.

ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे. संगमनेर तालुका कधीही लाचार नव्हता आणि कधी लाचार होणार नाही . माझे विरोधकांना सुद्धा आव्हान आहे कुणाची बाहेरच्यांची लाचारी पतकरू नका. आपण स्वाभिमानी आहोत. मागील एक वर्षांमध्ये तालुक्यात असुरक्षितता वाढली आहे.अमली पदार्थांची तस्करी, दादागिरी वाढली आहे. टोल वसुली सुरू आहे. हि टोल वसुली आपल्याला थांबवायची आहे. अमली पदार्थ बंद करायचे आहेत. रेल्वे पळवली जरी असली तरी ती खेचून आणू असे सांगताना विकास कामे कायम राहतील याकरता सर्व नागरिकांनी एकजुटीने सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असे आवाहन केले.

यावेळी उत्कर्षा रुपवते, माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!