राजुर पोलीस स्टेशन हद्दीत वारंघुशी येथे पेट्रोल व डिझेल अवैध विक्री ठिकाणावर छापा !  

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अकोले तालुक्यातील राजुर या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचा अवैध साठा करून त्याची गैरमार्गाने विक्री करण्यात येत होती पोलिसांना याची खबर रखताच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे मुद्देमालासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ गणेश लबडे, पोना/ राहुल डोके, पोना/ शामसुंदर जाधव, पोकॉ/ मनोज साखरे, चा.पोहेकॉ/ भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुप्त बातमीप्रमाणे वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे अवैधरित्या साठा करून डिझेल आणि पेट्रोलची विक्री होत असल्याची माहिती समजल्यानंतर पथकाने पांडुरंग लक्ष्मण सदगीर याच्या घरासमोर प्लास्टिक ड्रम मध्ये अवैद्य रित्या विक्री करीता ठवेलेले पेट्रोल व डिझेल ठेवले असल्याचे मिळून आले.

पांडुरंग लक्ष्मण सदगीर, वय 40 वर्षे, वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर यांस अवैद्य रित्या विनापरवाना बेकायदा, जिवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असतांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्याकरीता साठा करुन बाळगतांना मिळून आला.

सदरचे पेट्रोल व डिझेल हे लक्षमण ऊर्फ पांडू तानाजी घोंगडे, (रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक (नजरेआड) यांचेकडुन कमी भावामध्ये विकत घेत असल्याचे सांगितले. आरोपी 1) यांचे ताब्यातुन पेट्रोल व डिझेलने भरलेले 06 प्लॅस्टिक ड्रम आणि महिंद्रा बोलेरो कपंनीची मालवाहु पिकअप असा एकुण 6,41,370/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपी 1) पांडुरंग लक्ष्मण सदगीर, वय 40 वर्षे, वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर आणि 2) लक्षमण ऊर्फ पांडु तानाजी घोंगडे, रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक (फरार) यांचेविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/ 2293, राहुल कचरु डोके, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गु.र.नं. 340/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 287, 3(5) आणि अत्यावश्यक वस्तु कायदा, 1955 चे कलम 3, 7, 6 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयात एकुण 6,41,370/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला. गुन्हयातील आरोपी 1) आणि जप्त मुद्देमाल राजुर पो.स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास राजुर पोलीस स्टेशन करीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!